महाड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-
महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे… ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या दोन पदांचे एकत्रिकरण करून त्यांना नवीन नाव देण्यात आले आहे ग्रामपंचायत अधिकारी… या निर्णयामुळे ग्रामपंचायतींमध्ये सेवा अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल…शासनाच्या आदेशानुसार,या पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे विद्यमान वेतनमान कायम ठेवून सुधारित सेवांचा लाभ दिला जाणार आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
या निर्णयाचे महाड तालुक्यातील ग्रामसेवकांनी उत्साहात स्वागत केले आहे… पंचायत समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करत त्यांनी या निर्णयाचा आनंद साजरा केला. स्थानिक ग्रामसेवकांच्या मते, शासनाचा हा निर्णय त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी प्रेरित करणार आहे.