रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक ६ जून १६७४ साली झाला… त्यानंतर दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ साली झाला… या शिवराज्याभिषेकाचे बहुजन-मराठ्यांनी पौराहित्य केले होते… यामध्ये शिवरायांच्या मुस्लीम सैनिकांचा सहभाग होता… शाक्त राज्याभिषेक म्हणून हा राज्याभिषेक इतिहासात प्रसिद्ध आहे… निश्चलपुरी गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले होते… १८ पगड जाती या सोहळ्यात सहभागी होत्या… काही इतिहासकार या दिवसाकडे बहुजन समाजाचा धार्मिक मुक्ती दिन म्हणून पाहतात… राष्ट्रपिता जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना याच दिवशी म्हणजे २४ सप्टेंबर १८७३ साली पुणे येथे केली होती… दुसऱ्या शिवराज्याभिषेकानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म चिकित्साही सुरु केली… त्या अनुषंगानेच पुढे मुसलमान झालेल्या बहुजन-मराठयांचे शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्मात घेतले जात होते… असा हा २४ सप्टेंबर महान दिवस आहे… हाच दिवस या देशातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माकडे नेतो… कारण शाक्त पंथ बौद्ध धर्माशी निगडित असल्याचे मत प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांचे होते… त्यांनीच शिवरायांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाची चिकित्सा केलेली आहे… बहुजन मराठा समाजात या दिवसाला प्रचंड महत्व असल्याने दरवर्षी संभाजी ब्रिगेड आणि इतर बहुजन संघटना हा दिवस साजरा करतात… त्यानुसार यावर्षी मंगळवार २४ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील संभाजी ब्रिगेडने किल्ले रायगडावर दुसरा शिवराज्याभिषेक साजरा केला… संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून हा द्वितीय राज्याभिषेक साजरा करण्याचे हे नववे वर्ष आहे. यादरम्यान सबंध रायगड परिसर छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमून गेला…
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंतदेसाई, कोकण विभागीय अध्यक्ष सुभाष सावंत, कोकण कार्याध्यक्ष विश्वनाथ मगर, रायगड(द) जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे, महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल जाधव, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल पाटील,रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष कदम, उद्योजक भूषण भोसले, मराठा सेवा संघाचे जगदीश खैरनार, सातारा जिल्हा सचिव आनंदराव बर्गे, जिजाऊ ब्रिगेडच्या अपर्णा खांडेकर, ज्योती सावंत, मृणाल पवार, अभिलाषा कोरे , कविता चव्हान, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अरुण मोहिते, महाड तालुकाध्यक्ष कैलास अटक, पोलादपूर तालुकाध्यक्ष अमित वाडकर, अजित सुतार, सुजित सुतार उपस्थित होते… सचिन अटक आणि कंपनीचे जगदंब संबळ ग्रुप (नांदल कराड) हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण होते.