मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-
शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) दसऱ्याला उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे…मुंबई महापालिकेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चार स्मरणपत्र देण्यात आले होते…मुंबई महापालिकेने यासंबंधी नगर विकास विभागाशी सुद्धा सर्व परवान्यांसाठी प्रस्ताव पाठवला होता. यानंतर आज परवानगीचे पत्र शिवसेना ठाकरे गटाला प्राप्त झाले आहे.शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी मुंबई महापालिकेला अर्जासोबत मागील आठ महिन्यात चार स्मरणपत्र देण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यंदा कोणताही अर्ज करण्यात आला होता. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये यासाठी आठ महिन्याआधीच शिवसेना ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखांकडून अर्ज आणि स्मरणपत्र करण्यात आले होते…त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. यासंदर्भात बोलताना महेश सावंत म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची शिवाजी पार्क इथे घेण्यास परवानगी मिळाली आहे. शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीचा पत्र शिवसेना ठाकरे गटाला थोड्याच वेळात मिळणार आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चार स्मरणपत्र देण्यात आले होते . मुंबई महापालिकेने यासंबंधी नगर विकास विभागाशी सुद्धा सर्व परवान्यांसाठी प्रस्ताव पाठवला होता. यानंतर आज परवानगीचे पत्र शिवसेना ठाकरे गटाला प्राप्त झाला आहे . या परवानगीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले,आजपासून नवरात्र सुरु होत आहे. सगळ्यांना शुभेच्छा… आपण परंपरेनुसार शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्याला भेटणारच आहोत…