मागितली दोन हजार रुपयांची लाच… संदीप गोळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात… भरमसाठ पगार असतानाही कर्मचाऱ्याने घेतली लाच…

0
103

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

रायगड जिल्ह्यातील वैद्यकिय बिल आणि थकीत वेतन काढण्यासाठी लाच मागणारे संदीप गोळे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत…तक्रारदार शिक्षकाची वैद्यकीय बीले मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच घेताना वेतन व भविष्य निर्वाहन पथकाचा कर्मचारी संदीप शामराव गोळे यास रायगड अँटी करपशन विभागाने रंगेहाथ पकडले…तक्रारदार हे शिक्षक आहेत…आरोपी संदीप गोळे पेणजवळील वाक्रुळ शाळेमध्ये लिपिक म्हणून काम करत असून त्याची तात्पुरती नेमणूक वेतन व भविष्य निर्वाहन पथकामध्ये करण्यात आली होती…तक्रारदार शिक्षक यांचे पूर्वी मंजूर केलेले वैद्यकीय बिल अदा केल्याच्या मोबदल्यात दीड हजार रुपये व फेब्रुवारी २०२२ या महिन्याचे थकीत वेतन बिल मंजुरी करण्याकरिता पाचशे अशी एकूण दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी आरोपीने केली होती.दरम्यान तक्रारदार यांनी रायगड अँटी करपशन विभागाकडे तक्रार केली होती. रायगड अँटी करपशनचे उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले…