रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
राज्यात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शानसनाकडून आश्वासने दिली जात आहेत…नवनव्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र मुलींवरील, महिलांवरील अत्याचार अजूनही थांबण्याचे काही नाव घेत नाहीयेत…अवघ्या काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता…त्यानंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी आंदोलन करत सरकारला धारेवरही धरले…पण राज्यात अद्यापही असे विकृत नराधम फिरतच आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे.रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना घडलीय… शाळेतून घरी परतत असणाऱ्या १२ वर्षांच्या या अल्पवयीन मुलीला विनयभंगाला बळी पडावे लागले आहे…१२ वर्षाच्या या अल्पवयीन मुलीवर नराधमाने विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे… रोहा तालुक्यातील मौजे भुवनेश्वर परिसरातील संतापजनक घटना आहे…पीडित मुलगी ही शाळेतून घरी जाताना आरोपी मनीष विश्वकर्मा याने पीडितेचा पाठलाग करीत मेरी बेहन भी स्कूल से छुट्टी क्या ? असा बहाणा करीत तिच्या अंगाजवळ गेला…व तिच्यावर विनयभंग केला… भेदरलेल्या त्या पीडितेने कसेबसे तिच्यासोबत काय घडले हे तिच्या घरी जाऊन सांगितले… आणि हा संतापजनक प्रकार उघडकीस आला…हादरलेल्या पालकांनी तात्काळ रोहा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली… पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तातडीने कारवाई करून विनयभंग करणाऱ्या नराधम विकृत आरोपीला अटक केली आहे…आरोपीवर भा.दं.वि कलम ७४,७८ सह बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे…याप्रकरणी अधिक तपास रोहा पोलीस करीत आहेत…