Sunday, November 10, 2024
HomeUncategorizedकोकणतब्बल आठ कोटी रुपयांची चांदी सापडली... खालापूर पोलिस व भरारी पथकाची कारवाई...

तब्बल आठ कोटी रुपयांची चांदी सापडली… खालापूर पोलिस व भरारी पथकाची कारवाई…

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम ) :-

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने जागोजागी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला गेला आहे… प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे… नाकाबंदी केल्यावर खालापूर टोलनाक्यावर MH.01.EM.8775 क्रमांकाचा  पिकअप टेम्पो खालापूर पोलिस व भरारी पथकाला संशयितरित्या आढळला… या टेम्पोची तपासणी केली असता तब्बल 8 कोटी रुपयांची चांदी वेगवेगळ्या स्वरूपात लपून ठेवलेली आढळली… खालापुर पोलिसांनी व भरारी पथकाने मोठी कारवाई केली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून याबाबत पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत…

खालापूर उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना खात्रीशीर माहिती मिळाली, तेव्हा ही कारवाई करण्यात आली… खालापुर पोलिस व भरारी पथकाने हि कारवाई केली… टेम्पोत 171 कुरिअर बॅगमध्ये 8 कोटी रुपयांची चांदी लपवण्यात आली होती… याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments