माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
राज्यात विधानसभा निवडणुकीतील प्रचाराने रायगडमध्ये आता वेग घेतला आहे…राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांचेही आता पुढील आठवड्यात आयोजन केले जाणार आहे…त्या अनुषंगाने येत्या १३ नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची म्हसळा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे…या सभेची जोरदार तयारी राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे…रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला श्रीवर्धनची जागा मिळाली आहे…यामधून अनिल नवगणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे…नवगणे हे विद्यमान महिला,बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत…खा.सुनील तटकरे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले असल्याने ज्यांनी ज्यांनी आपली साथ सोडली त्या-त्या नेत्यांना अडविण्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेले आहेत…याचाच एक भाग म्हणून त्यांची सध्या तरी म्हसळा येथे जाहीर प्रचारसभा आयोजित करण्यात आलेली आहे…सदर सभेस सुमारे २०हजाराहून अधिक लोक येण्याची अपेक्षा असल्याचे मत माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी सांगितले आहे…सदर सभेच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल नवगणे यांनी गुरुवार दि. ७ रोजी दुपारी दरम्यान पाहाणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत ज्ञानदेव पोवार, म्हसळा ता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजहर दनसे तसेच काही कार्यकर्ते उपस्थित होते…या सभेला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणी संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती पक्षाचे तालुका अध्यक्ष अजहर धनसे यांनी दिली आहे. श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरुध्द राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना श्रीवर्धन मतदारसंघात रंगणार असल्याने शरद पवार सभेला नेमके काय बोलणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे…