रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
रसायनीतील मोहोपाडा परिसरात छटपूजा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला… रसायनी परिसरात तसेच शहरातील विविध तलावांच्या ठिकाणी छटपूजा उत्साहात साजरी केली…शहरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांनी छटपूजेचे आयोजन केले आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो व संसार सुखाचा होवो यासाठी ही छटपूजा केली जात असल्याची माहिती संजय गुप्ता यांनी केली… मोहोपाडा परिसरात विविध जाती धर्माचे तसेच विविध प्रांतातून आलेले नागरिक राहतात… यामध्ये बिहार ,उत्तर प्रदेश या विभागातील नागरिकांची संख्याही खूप मोठी आहे…यावेळी सर्वच उत्तर भारतीय माता बंधू भगिनींनी आपसातील हेवे दावे विसरून संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन उत्तर भारतीय हिंदी भाषिक नेते संजय गुप्ता यांनी रिस येथे आयोजित केलेल्या छटपूजा प्रसंगी व्यक्त केले.छटपूजा हा आपल्या उत्तर भारतीयांचा पवित्र सण असल्यामुळे या सणाला संपूर्ण भारतात विशेष महत्व प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया संजय गुप्ता यांनी व्यक्त केली. आमचे सर्व उत्तर भारतीय बांधव एक दिलाने एक मनाने एकत्रित येऊन पवित्र अश्या छटपूजा उत्सव मोठ्या उत्साही आनंदमय वातावरणात साजरा करतात…रसायनी-मोहोपाडा परिसरात उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र असा छटपूजा सण मोठ्या भक्तीमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला.महाराष्ट्रात उत्तर भारतीय नागरी उद्योग व्यवसाय निमित्ताने मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत.कार्तिक महिन्यात ७ नोव्हेंबरला सर्वत्र ठिकाणी छटपूजा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो…७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सर्व उत्तर भारतीय माता भगिनी सूर्य मावळत्या वेळी अत्यंत मनोभावे पूजा अर्चा करून सूर्यनारायणाची पूजा करतात.तर दुसऱ्या दिवशी(८ नोव्हेंबर) रोजी सूर्योदय झाल्यावर सर्व भाविक महिला भक्तगण सकाळी सूर्योदयाची मोठ्या भक्ती भावाने पूजा करतात.हा उत्सव उत्तर भारतीय नागरिकांमध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. छटपूजेच्या कार्यक्रमाप्रसंगी मोहोपाडा वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे,ताई पवार ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या संगीता भोईर,नेहाताई भूषण पारंगे,माजी सभापती रमेश पाटील,अजय शेठ सावंत,देविदास म्हात्रे, दीपिका भंडारकर,वैजंयती ठाकूर,यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गुप्ता,प्रशांत गुप्ता, दुर्गेश मिश्रा,विनोद यादव,अंबिका यादव, मनीषा गुप्ता,रेखा यादव आशा शर्मा आदींनी विशेष मेहनत घेतली…