नवी मुंबई शिवसाता टाइम्स (वार्ताहर):-
घणसोली गावातील नवघरआळी येथे बिल्डिंग कॉन्ट्रेक्टरने घरमालकाच्या बायकोच्या पोटात चाकू घुसवण्याची घटना 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:15 घडली. याबाबत सुनिल नारायण पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे…
या तक्रारीत ते असे म्हणतात की…मी, सुनिल नारायण पाटील, वय 53 वर्षे, धंदा बस कंडक्टर, रा. सिध्दाई निवास बिल्डींग न. 1235/003, दुसरा माळा, रुम न. 201, सेक्टर 16, नवघरआळी, घणसोली गाव, नवी मुंबई मो. न. 9870833909 समक्ष पोलीस ठाण्यात हजर होवुन जबाब लिहून देतो की, मी वरीलप्रमाणे असुन वरील ठिकाणी पत्नी पौर्णिमा पाटील, मुलगी रिया पाटील, भाचा वेद सागर पाटील यांच्यासह राहतो. मी घणसोली बस डेपो येथे बस कंडक्टर म्हणून नोकरीस असून नवघर आळी घणसोली गावात सेक्टर 16 मध्ये गट क्र. 605 ही जागा माझे मालकीची आहे. सन 2013 मध्ये सदर जागेत बिल्डींग बांधकाम करणेसाठी कॉन्ट्रेक्टर निलेश दत्तात्र्य घरत रा. तुर्भे यांच्या सोबत मी करार केला होता, कराराप्रमाणे सदर इमारतीत बांधकाम केलेल्या एकूण 15 रूम पैकी कॉन्ट्रॅक्टर नीलेश घरत यांनी मला आठ रूम व त्यांना सात रूम ठेवण्याचे ठरवले होते. परंतु त्यांनी मला एकूण सात रूमचा ताबा दिला होता. त्यामुळे मी त्यांना वारंवार विनंती करूनही आठवा रूम नावावर करून दिला नव्हता. सदर व्यवहार पूर्ण न झाल्याने मी त्यांना इमारतीमधील तिस-या माळयावरील रूम न. 302 चा ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण करण्याची विनंती केली होती. परतु नीलेश घरत यांनी सात ऐवजी आठ नंबर रूमची घरपट्टी स्वतःच्या नावावर करून घेतली असल्याचे मला समजले, तसेच सदर आठही रूम निलेश घरत यांनी विकायला काढल्याचे मला समजले. त्यामुळे मी दिड महीन्यापुर्वी खालच्या माळ्यावरील तीनही रूमाला मी आमचे कुलूप लावले होते. तसेच निलेश घरत यांना ठरल्याप्रमाणे आठ रूम माझे नावावर घरपट्टीसह करणेस विनंती करत होतो. त्यावरून निलेश घरत यांनी यापूर्वी वारंवार वाद घातला होता. आज दिनांक 05/11/2024 सकाळी 04.45 वाजता मी बस डेपो येथे ड्युटीला गेलो होतो. मी ड्युटीवर असतांना दुपारी 12.30 वाजता मेव्हणे आकाश जयहिंद पाटील यांनी फोन करून कळवीले की, निलेश घरत याने बहीण पौर्णीमा हिस चाकु मारला असे सांगीतल्याने मी लागलीच घरी परत आलो असता पत्नी पौर्णीमा हिच्या पोटायर बेंबीचे बाजुला जखम दिसुन आली तेंव्हा भाचा वेद सागर पाटील याने सांगितले की, कॉन्ट्रेक्टर निलेश दत्तात्रय घरत, त्याची पत्नी प्रिया निलेश घरत दोन्ही रा. तुर्भे तसेच त्याचा सुपरवायझर रोहीत राम राणा असे ग्राउन्ड फ्लोरला येवून आपण त्यांच्या रुम ला लावलेले कुलूप तोडत असल्याचे आत्या पौर्णीमा हिला समजल्याने त्यांनी खाली येवून तुम्ही आमचे रुमचा ताबा देत नाही घरपट्टी नावावर करत नाही. तोपर्यंत तुमच्या रुमचे कुलूप तोडु नका असे सांगितले असता त्यांनी आत्या पौर्णीमा हिच्या सोबत वाद घालुन शिवीगाळ करत कॉन्ट्रेक्टर निलेश दत्तात्रय घरत याने त्याचे हातातील चाकु आत्या पौर्णीमा हिच्या पोटात मारला असे सांगीतले. तेंव्हा मी लगेच पत्नी पौर्णीमा हिला मेव्हणे आकाश पाटील यांच्या मदतीने क्रिडेन्स् केअर हॉस्पीटल घणसोली या दवाखान्यात उपचाराकरता नेल्यावर तेथे डॉक्टरानी प्राथमिक उपचार करुन दुस-या दवाखान्यात घेवुन जाण्याचे सांगीतल्याने आम्ही पत्नी हीस उपचारासाठी एम जी एम हॉस्पीटल वाशी येथे दाखल केले असुन तिच्यावर दवाखान्यात उपचार चालु आहेत.
तरी आज दिनाक 05/11/2024 रोजी दुपारी 12.15 वाजण्याचे सुमारास सिध्दाई निवास बिल्डींग न. 1235/003 ग्राउन्ड फ्लोर येथे कॉन्ट्रेक्टर निलेश दत्तापय घरत याने करारा प्रमाणे आठ रुमची घरपट्टी माइया नावावर न केल्याने आम्ही त्याचे ग्राउन्ड फ्लोरच्या रुमला कुलूप लावल्याचा त्यास राग येवून कॉन्ट्रेक्टर निलेश दत्तात्रय घरत, त्याची पत्नी प्रिया निलेश घरत, दोन्ही रा. तुर्भे व त्यांचा सुपरवायझर रोहित राम राणा रा. घणसोली या तिघानी पत्नी पौर्णीमा हिच्या पोटात चाकू मारुन तिला जिवे ठरा मरण्याचा प्रयत्न केला वरील तिघांविरोधत माझी फिर्याद आहे .