खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे ) :-
खोपोली नगरपरिषद हद्दीत येणारे हाळ बुद्रुक गावातील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड उंच उंच गवत,झाडी झूडपे वाढल्याने विषारी साप,विंचू सारख्या जनावरांच्या भीतीने कब्रस्तानमध्ये जाणे जिगरीचे झाले आहे.मुस्लिम समाजामध्ये मृत झाल्यास कबर खोदून दफन विधी करण्यात येते..कब्रस्तानमध्ये प्रचंड वाढलेल्या गवत, झाडीमूळे कबर खोदण्यास तेसच आधीच्या जुन्या कबरी गवताने झाकल्याने दिसून येत नसल्यामुळे कबर कुठे खोदवी असा प्रश्न उपस्थित होत मुस्लिम बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे… कब्रस्तानची एका बाजूने संरक्षण भिंत कोसळली तर अनेक ठिकाणी भिंतीला भले मोठे तळे गेले असून बांधण्यात आलेल्या रूमचा दरवाजा तुटून जमिनीवर पडला आहे…लोखंडी शेडवर टाकण्यात आलेले सिमेंटचे अनेक पत्रे ही फुटले असून कब्रस्तानची अक्षरशा बिकट अवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे…खोपोली नगर परिषदेचे मुख्यधिकारी पंकज पाटील यांना अनेक वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधून तसेच अनेक वेळा कार्यालयात भेटून तोंडी विनंती करीत तक्रार करण्यात आली होती…कब्रस्तान स्वच्छ करण्यासाठी संबंधित विभागाला सांगितले असतांना मुख्याधिकारी यांच्या आदेशाला आरोग्य विभाग व उद्यान विभाग प्रमुखकाकडून केराचीटोपली दाखवली जात आहे.मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये साफसफाई होण्यासाठी कोणत्याच अधिकाऱ्याने साधी पाहणी करण्याचे कष्ट केले नाही…कार्यालयामध्ये बसून आश्वासने देण्यात आली असल्याचे ग्रामस्थांचा आरोप आहे…अखेर संतापून हाळ बुद्रुक गावातील मुस्लिम बांधवांनी खोपोली नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नगरपरिषद मध्ये भेट दिली… मात्र मुख्य अधिकारी साहेब निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळताच आरोग्य विभागाचे राहुल जाधव यांना भेटून विनंती केली जाधव यांनी शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी दोन ते तीन सफाई कर्मचारी पाठवले मात्र तास भर काम केल्यावर हे काम आमच्या कडून होणार नाहीं याला गवत कटिंग मशीनने गवत कापावे लागेल… असे सांगण्यात आले…मुस्लिम समाजाच्या समस्यावर नगर परिषद दुर्लक्ष का करीत आहे ? मुस्लिम समाज या देशातले नाहीत का?आम्ही नगरपरिषदेला कर भरत नाहीत का? संविधानाने आम्हाला कोणतेच अधिकार दिले नाहीत का?आमच्यासोबत असा भेदभाव का केला जातो?असा भेदभाव करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांची त्वरित बदली करण्यात यावी? अशी मागणी करीत मुस्लिम बांधवांनी प्रश्न उपस्थित केले…कब्रस्तानमधील लवकरात लवकर गवत सफाई न झाल्यास निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू? असा इशारा देत मुस्लिम बांधवांनी संताप व्यक्त केला…