Tuesday, December 10, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडउमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी आपल्या निशानी प्रेमाचे आहेर पाकिट चिन्हाचे केले शानदार...

उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी आपल्या निशानी प्रेमाचे आहेर पाकिट चिन्हाचे केले शानदार अनावरण…

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी आपली निशाणी “पाकिट” चिन्हाचे शानदार अनावरण केले.
यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे महा सचिव तथा ठाणे जिल्ह्याचे प्रभारी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे संघटक वैभव म्हात्रे,जिल्हा काँग्रेस पक्षाचे सचिव डॉ. नरेंद्र सिंह, तळा ता.काँग्रेस अध्यक्ष शरद भोसले, माणगाव ता. काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे,अलिबाग ता.अध्यक्ष भास्कर चव्हाण, पेण ता. उपाध्यक्ष धीरज म्हात्रे, पेण ता. मानव अधिकार संघटनेचे रवींद्र म्हात्रे, पदाधीकारी, महिला कार्यकर्त आणि पुरुष सदस्य उपस्थित होते.
प्रेमाचे आहेर म्हणुन ‘पाकीटचे लोगो चिन्ह.’ अनावरण केल्यानंतर उपस्थित सर्व काँग्रेस जणांनी काँग्रेस पक्षाचा विजय असो, स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले अमर रहे, अमर रहे, काँग्रेस पक्षाचे स्वर्गीय माजी आमदार मधुकर ठाकूर, माणिक जगताप आणि रवींद्र राऊत यांच्या परीही अमर रहे अशा घोषणा देऊन अंति श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघांचे काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते यानी राजाभाऊ ठाकूर आगे बडो अशा घोषणा दिल्या…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments