अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ.चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचा नारळ रेवदंड्याचे ग्रामदैवत मारुती मंदिर येथे मविआची निशाणी “शिट्टी” वाजवत फोडण्यात आला…विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे बारा दिवस उरले आहेत…घरोघरी जाऊन गाठीभेटी घेणे आता शक्य नाही…त्यामुळे उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांचा धडाका लावला आहे…शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दि.९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता प्रचाराचा नारळ फोडण्यात आला…
महाविकास आघाडीचे शेकापचे नेते आमदार जयंत पाटील,शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेस चौल विभागीय अध्यक्ष अशोक आंबुकर,शेकापचे रेवदंडा ग्रामपंचायत मा.सरपंच सदाशिव मोरे, सौ.सोनाली मोरे, सदस्य संतोष मोरे, राजेंद्र वाडकर, सुरेश खोत, निलेश खोत, कबन नाईक, राजेंद्र चुनेकर, हेमंत गणपत, प्रमोद नवखारकर व पदाधिकारी शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख मारुती भगत, चौल उपसरपंच अजित गुरव, सदस्य जयवंत ठोंबरे पदाधिकारी काँग्रेसचे विभागीय खजिनदार सुगम आंबुकर, आशिष गोंधळी, सदस्य सौ.गोंधळी, नवाब तांडेल, संगीता महिमकर, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिवसभर प्रचार फेऱ्या आणि रात्री कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सूचना केल्या जात आहेत…विधानसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयार सुरू होती…उमेदवारी माघारीनंतर आता प्रत्यक्षात प्रचाराचा श्रीगणेशा झाला आहे…उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. तालुक्यातील बहुतांश उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे…त्यांची यंत्रणाही कामाला लागली आहे…महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष अशोक आंबुकर व इतर घटक पक्षांचे नेते उपस्थित होते…