Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडहाळ बुद्रुक गावातील गटारचे काम निकृष्ट दर्जाचे ?... हाळ बुद्रुक ग्रामस्थांची निवेदनाद्वारे...

हाळ बुद्रुक गावातील गटारचे काम निकृष्ट दर्जाचे ?… हाळ बुद्रुक ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी…

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

खोपोली नगरपरिषद हद्दीत येणारे हाळ बुद्रुक गावातील उर्दू शाळेसमोरील मुख्य रस्त्यालगत नवीन गटार बांधण्याचे काम नगरपरिषद प्रशासन ठेकेदारामार्फत करीत आहे…गेल्या अनेक वर्षांनंतर गटाराच्या कामाला मूर्त लागल्याने कामाला सुरुवात करण्यात आली.जेसीबी मशीनद्वारे जुना गटार खोदण्यात आला. खोदलेल्या गटारमध्ये दगर कपची टाकून भरणी करण्यात आली. या दगर कपचीवर सिमेंट काँक्रीटचा माळ टाकून पीसी करण्यात अली. मात्र हे सिमेंट काँक्रीटचे माळ बनविण्यासाठी २०घमाळ ग्रीट पावडर व २०घमाळ खरी आणि ४ घमाळ सिमेंट टाकून काँक्रीटचे माळ जागी तय्यार करीत सुरक्षेच्या हेतूने मजुरांच्या पायात बुटे,हातात हॅण्डगु्लोज, रेडियम जॅकेट, डोक्यात हेल्मेट न देता पीसी केली जात असल्याचा आरोप करीत हाळ गावातील ग्रामस्थांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.हा टाकण्यात येणारा कॉंक्रीट अक्षरशः निकृष्ट दर्जेचा असून चार दिवस टिकणार नसलाचा आरोप करीत ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मांगणी करीत हाळ ग्रामस्थांनीने नगर परिषदेचे बांधकाम विभागाकडे तक्रार करत मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले… आचारसंहिता असली तरी आम्ही निकृष्ट कामाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू…व पुढे जे होईल त्याची संपूर्ण जबाबदारी आपली व खोपोली नगर परिषद प्रशासनाची राहिल याची नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे खोपोली नगर परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. सदर अधिकारी निकृष्ट दर्जाचे काम होत असताना तसेच सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असताना डोळे बंद करून बसले होते. अशा कामचुकार, आळशी, बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे आपले व खोपोली नगर परिषद प्रशासनाचे नाव खराब होत असते, तरी लवकरात लवकर आमच्या अर्जावर कार्रवाई करण्यात यावी व कार्रवाई काय करण्यात आली याची लेखी माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी. तोपर्यंत गटारीचे काम बंद ठेवावे अन्यथा आम्ही गटारीचे काम होवू देणार नाही, याची आपण नोंद घ्यावी. असे निवेदन देऊन नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments