Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडमहाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापल्याने शेकाप विरोधात तक्रार... उरण-पनवेलमधून ठाकरे गटाची निवडणूक...

महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापल्याने शेकाप विरोधात तक्रार… उरण-पनवेलमधून ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव…

 पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष आणि ठाकरे गटामध्ये वाद रंगला आहे…ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे शेकापच्या उमेदवारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर असताना शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो वापरत असल्याने ठाकरे गटाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच पद्धतीने पनवेल मतदारसंघातील शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे देखील महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्याचे फोटो वापरत असल्याचे सांगत ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शेतकरी कामगार पक्ष मविआचा भाग होता…मात्र विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात शेकापने अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार जागांवर दावा केला होता. मात्र उरणची जागा सोडण्यास ठाकरेंनी नकार दिला. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत. दरम्यान पनवेलमधील एका सभेत शेकापचे उमेदवाराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकारत महाविकास आघाडी हा शब्द वगळला असला तरी मविआच्या राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांची छायाचित्रे लावून प्रचार करण्यात आला होता. प्रचारात नेत्यांचे फोटो वापरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून आचारसंहितेचा भंग करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments