महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने) :-
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना महाड विधानसभा मतदार संघात दोन शिवसेनेत थेट लढत होत आहे…मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेकडून भरत गोगावले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून स्नेहल जगताप महाड विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत…शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून स्नेहल जगताप यांनी पक्षप्रवेशाचा चांगलाच धडाका लावला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून देखील महाड तालुक्यात पक्ष प्रवेशाचा चांगलाच झंझावात पहावयास मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे कामगार युनियनचे रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश देशमुख यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश झाला आहे. यापूर्वी देखील वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाड तालुका अध्यक्ष मुदस्सीर भाई पटेल तसेच राष्ट्रवादीच्या महाड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे या पक्ष प्रवेशाचा थेट उबाठा गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांना फायदा होणार असून आमदार गोगावले यांची शीट धोक्यात असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे…