पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदीप मोकल ) :-
जेएसडब्लु कंपनीत काराव ग्रामपंचायत हद्दीतील सुक्षिशिक्षित तरुण आदिवासी बांधवांना नोकरीत सामावुन घ्यावे या मागणीसाठी काराव ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश म्हात्रे, सदस्या भागश्री कडु, मुक्ता वाघमारे यांनी आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे…
पेण तालुक्यातील ग्रामपंचायत काराव हद्दीतील बेरोजगार विद्यार्थ्यांना जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने नोकरीत सामावून घ्यावे आदि मागण्यांसाठी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी जेएसडब्ल्यू कंपनीच्या कारावी येथील गेट समोर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता… या उपोषणाच्या अनुषंगाने पेण तहसीलदारांनी जेएसडब्लु कंपनी व्यवस्थापनाला काराव ग्रामपंयतीसोबत उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करुन त्यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर कार्यवाही करावी व उपोषणापासुन परावृत्त करावे असे सुचित केल्यावर जे.एस.डब्लु कंपनी व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांच्यासोबत चर्चा करण्यात आली… या चर्चेमध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये भरती प्रक्रीया सुरु होणार या भरती प्रक्रियेमध्ये पंचायतीच्या पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल असे अश्वासित केल्याने काराव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांनी पुकारलेले जे.एस.डब्लू गेटसमोरील उपोषण तूर्त स्थगित केले होते…
31 आॅक्टोबंरपर्यंत आय.टी.आय धारक स्थानिकांना नोकरीत सामावुन घेतले जाईल व डिप्लोमा, डीग्री धारकांची भरती प्रक्रीया सुरु केली जाईल असे अश्वासन कंपनी व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीला दिले होते…. परंतु आॅक्टोबंर महीना संपून 15 नोव्हेबंरपर्यंत नोकरभरती प्रक्रीये संदर्भात उपाय योजना केली नाही… तरी नोकरभरती तात्काळ करावी या मागणीसाठी काराव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेश तुकाराम म्हात्रे, भाग्यश्री रांजेद्र कडु, सदस्या मुक्ता अंकुश वाघमारे यांनी 6 डीसेबंर रोजी जेएसडब्लु कंपनी विरोधात आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे….