नागोठणे शिवसत्ता टाइम्स (विनोद भोईर ) :-
नागोठणे रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्दीत सापडले असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत…या स्थानकावर रोहा दिवा, दिवा रत्नागिरी आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या येथे थांबतात. नागोठणे रेल्वे स्थानकातून नागोठणे पंचक्रोशी सह, सुधागड तालुक्यासह इतर आजूबाजूच्या गावातील नोकरदार वर्ग विद्यार्थी दररोज रेल्वेने प्रवास करतात. मात्र रात्री परतीच्या वेळी या प्रवाशांना नागोठणे रेल्वे स्थानकातून जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करावा लागतो…नागोठणे रेल्वे स्थानकातील दोन्ही फलाटावरील दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे तसेच गवत वाढलेले आहे…या गवतातून अनेक वेळा रात्रीच्या वेळी मोठ मोठाले विषारी साप प्रवाशांनी पाहिले आहेत या गवतातून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना रात्री प्रवास करावा लागतोय. आणि येथील स्वच्छतागृहाची देखील दुरावस्था झाली असून दुर्गंधी पसरलेली आहे. रेल्वे स्थानकातील गैरसोयीमुळे बहुतांशी प्रवासी त्रस्त होऊ लागले असून येथील समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली आहे…
दोन्ही फलटावर पसरलेले गवताचे साम्राज्य तात्काळ हटवून प्रवाशांसाठी फलाटाची स्वच्छता करण्यात यावी. एखाद्या प्रवाशाला विषारी सापाचा दौंश झाल्यास त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे रेल्वे प्रवाशी रुपेश खांडेकर यांनी सांगितले आहे..