खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात किरवली येथील 45 वर्षीय महिला व तिची 20 वर्षीय मुलगी कर्जत पंचायत समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत… सुरूवातीला कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी या महिलांना पंचायत समिती आवारात उपोषणाला बसू दिले नाही…आमच्या आवारात उपोषण करता येणार नाही, असे सांगत कर्जत पंचायत समितीच्या आवारातून महिला आंदोलकांना हुसकावून लावण्यात आले…
यानंतरही कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना ‘त्या’ माय-लेकीची दया आली नाही… अन्यायग्रस्तांना न्याय देण्यापेक्षा उपोषणाला कशाला बसायचे, असा सूर गटविकास अधिकारी यांनी लावला आहे… एवढेच नव्हे तर एक महिला व तिची 20 वर्षीय मुलगी उपोषणाला बसली असताना रात्रीच्या सुमारास त्यांच्या सुरक्षेचे काय? याचा विचार गटविकास अधिकारी यांनी केला नाही… पत्रकारांनी कर्जत प्रातांधिकारी प्रकाश सकपाळ, कर्जत डिवायएसपी व रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधत महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा केल्यावर महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले… दुसरीकडे या महिला रात्रीच्या सुमारास शौचालयाला कुठे जातील? याचा विचार गटविकास अधिकारी यांनी केला नाही… पत्रकारांनी इमारतीत त्यांना जावू द्यावे, अशी विनंती केली पण मानवताहिन गटविकास अधिकारी यांनी त्यांना उपोषण मागे घ्यायला लावा… आम्ही इमारतीचे शौचालय वापरू देवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
महिलांच्या सुरक्षतेबाबत राज्य सरकार संवेदनशील असताना कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील महिला सुरक्षिततेबाबत अतिशय उदासिन असल्याचे दिसून येत आहे… अशा उदासिन अधिकाऱ्यावर प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे…