पेण शिवसत्ता टाइम्स (किरण बांधणकर ) :-
साई सेवक अध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या वतीने पेण ते शिर्डी मार्गे निघणाऱ्या साई सेवक पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन मंगळवार ३ डिसेंबर रोजी करण्यात आले असून मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी पर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे…
९ व्या वर्षाचे औचित्य साधत साई सेवक पालखी पदयात्रेला सकाळी ९ वाजता पेण साई मंदीरापासुन सुरूवात झाली… सर्व साईभक्तांनी सोहळ्याप्रसंगी साई मंदिरात उपस्थित राहून साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेतले…. यावेळी उद्योजक व साई सेवक गणेश गायकर, उद्योजक राजुशेठ पिच्चिका शिवराय हाॅटेल मालक नंदेश पाटील नितिन महाजन, वैकुंठ पाटील, श्रीमती इंदुमती जाधव (वरसई) पंकज घोसाळकर माजी नगरसेवक भावना बांधणकर संजय पाटील दिपक रामाणे लल्ला आवास्कर अध्यक्ष गणेश जांभळे, महेश म्हात्रे, दिनेश खामकर, अविनाश जोशी (गुरुजी) प्रसन्ना जोशी, दिपक समेळ, आप्पा पवार विलास पाटील सुनिल जाधव आदी साई सेवक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते… तसेच ‘साई सेवक पदयात्रा पालखी सोहळा पेण शिर्डी’ मंगळवार दि. ०३/१२/२०२४ ते मंगळवार दि. १०/१२/२०२४ पर्यंत संपन्न होणार आहे… तसेच शनिवार दिनांक १४/१२/२०२४ रोजी श्री.दत्त जयंती निमित्त संध्या. ७:०० ते १०:०० या वेळेत ‘पालखीचा साईंचा भंडारा’ आयोजीत केलेला आहे… तरी आपण सदर कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा… त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर शनिवार दिनांक १४/१२/२०२४ रोजी सकाळी ०९:०० ते ०३:०० या वेळेत होईल… साई सेवक अध्यात्मिक सामाजिक संस्था, पेण या कार्यक्रमाचे ठिकाण साई मंदिर, पेण नगरपालिका, कासार तलाव, पेण येथे आयोजित करण्यात येणार आहे… तसेच अध्यक्ष गणेश जांभळे यांनी सांगितले की, हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी दरवर्षी ज्या देणगीदारांचे आम्हास अमुल्य सहकार्य लाभत त्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत…