अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
जिल्ह्यातून उत्तम खेळाडू तयार व्हावेत, यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर क्रीडा संकुले बांधण्यात आली आहेत… मात्र, तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाची वाईट अवस्था आहे… जिल्हा क्रीडा संकुल हे निवडणुकीसाठी वापरले जाते तर विभागीय क्रीडा संकुल कागदावरच आहे… जिल्ह्यात क्रीडा संकुले असूनही ती खेळाच्या सरावासाठी योग्य नसल्याची परिस्थिती असलेली दिसून येत आहे… त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू जिल्ह्यातून कसे निर्माण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे… रायगड जिल्ह्यातील खेळाडू प्रत्येक खेळात पारंगत आहेत मात्र, काही ठिकाणी मैदाने आहेत; मात्र तेथे सुविधा नाहीत, अशी अवस्था आहे… महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, येथे तालुका क्रीडा संकुल बांधण्यात आली आहेत… श्रीवर्धन बोर्लीपंचतन येथील क्रीडा संकुल सोडले तर इतर ठिकाणी संकुलाची दुरवस्था आहे… त्यामुळे खेळाडूंना सराव करण्यास अडचणी येत आहेत… करोडो रुपये खर्च करूनही क्रीडा संकुलाची दुर्दशा झाली आहे…