९३ वजनी पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप गटात मैत्रेय मोकल यांना सुवर्णपदक… याआधीही तीन राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पटकावले होते सुवर्णपदक

0
122

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

२९, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०२४ रोजी  झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उरण तालुक्यातील  जसखार गावातील मैत्रेय राजेश्री गणेश मोकल यांची ९३ वजनी गटात सुवर्णपदक जिंकून छत्तीसगड येथे होणाऱ्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे… याआधीही त्यांनी तीन राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले आहेत… त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक संस्था, राजकिय नेते आणि  ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे….