पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदिप मोकल):-
जेएसडब्ल्यू कंपनीत काराव ग्रामपंचायत हद्दीतील सुक्षिशिक्षित तरुण बांधवाना नोकरीत सामावून घ्यावे… या मागणीसाठी काराव ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश म्हात्रे, सदस्या भाग्यश्री कडु, मुक्ता वाघमारे यांनी उपविभागिय अधिकारी कार्यालय पेण येथे लाक्षणिक उपोषण केले… यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते… रायगड जिल्ह्यातील डिप्लोमा डिग्री व आय.टी.आय. पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता काढलेल्या नोकरभर्ती संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत काराव व जे.एस.डब्ल्यू आस्थापन यांच्यामध्ये चर्चेनुसार ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील ज्या डिप्लोमा, डिग्री, आय.टी.आय. धारक विद्यार्थ्यांनी जे.एस.डब्ल्यू. कंपनीच्या लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे, अशा विद्यार्थ्यांची यादी सादर केलेली आहे… त्याविषयी आपल्यासोबत वारंवार चर्चा केलेली आहे, आपण प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ केली व वेळ मारून नेत होते… सदरील भरती आपण आपल्या पद्धतीने केलेली असून काराव ग्रामपंचायत मधील मुलांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे… ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीत आपल्या कंपनीची वाढ ही ५०% हून जास्त प्रमाणात झालेली आहे व होणार आहे, असे दिसून येत आहे… असे असताना आपल्या कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या अमर्याद प्रदुषणाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे भयंकर त्रास हा ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील समस्त ग्रामस्थांना भेडसावत आहे, असे असून सुद्धा आपण सदरील भर्तीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील मुलांना डावलून रायगड जिल्ह्यातील इतर भागातील मुलांना प्राधान्य दिले, असे समजते… सदरील भर्ती आम्हास अमान्य आहे, तरी जे.एस.डब्ल्यू, प्रशासनाने ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील डिप्लोमा, डिग्री, आय.टी.आय. धारक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोकरीत समाविष्ट करावे असे निवेदन उपविभागिय अधिकारी यांना दिल्यानंतर उपविभागिय अधिकारी प्रविण पवार यांनी जे.एस.डब्लू कंपनीच्या अधिकारी बलवंत जोग व आदि अधिकारी यांना बोलवून घेऊन उपोषण करते व कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली… झालेल्या चर्चेत काराव ग्रामपंचायतमधील आयटीआय, इंजिनियर्सना भरती प्रक्रियामध्ये प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काराव ग्रामस्थांना दिले… यावेळी ग्रा.पं.काराव सदस्य दिनेश तुकाराम म्हात्रे, मुक्ता अंकुश वाघमारे, भाग्यश्री राजेंद्र कडू, आंदोलन मार्गदर्शक अरुण शिवकर, ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील, ग्रामपंचायत सदस्य पंचायतीमधील ग्रामस्थ,आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते…