खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शनिवार दि. ०७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजण्याच्या सुमारास फूडमॉल इन फूडकोर्ट हॉटेल येथे एक्सप्रेसवे वरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरचा भयानक अपघात झाला… या अपघातात १९ वर्षीय कामगाराचा मृत्यू झालाअसून ३ कारला जोरदार धडक बसली… मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून पुण्याहून मुंबई कडे जाणारा ट्रेलर क्रमांक MH 46 BM 0343 वरील चालक बिपीन यादव रा.सहागण, जि.जोनपूर उत्तरप्रदेश याचे ट्रेलरवरून नियंत्रण सुटले…त्यामुळे ट्रेलर फूडमॉल इन येथील हॉटेल फूडकोर्ट हॉटेलच्या आवारात शिरला … ट्रेलरने एंट्री गेटच्या पहिल्या पिलरला जोरदार धडक दिली… या अपघातात हॉटेल उडपी येथील काम करणारा इंद्रदेव पासवान रा. सारसा बिहार वय. 19 वर्ष याचा ट्रेलर खाली येऊन मृत्यू झाला… ट्रेलरने फूडकोर्ट येथील पार्किंग करिता लावलेल्या कार क्रं.(१)MH 05 EV 7843, (२)MH 14 LM 2880, (३)MH 09 EM 381 या ३ वाहनांना जोरदार ठोकर मारली… हा ट्रेलर हॉटेलच्या पिलरला न धडकता थेट हॉटेलमध्ये शिरला असता तर मोठी दुर्घटना घडली असती… या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स, स्वामिनी ॲम्बुलन्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि यांनी मदतकार्य केले…