खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे ) :-
खालापूर पोलीस ठाण्यात शनिवार दि.7 डिसेंबर 2024 रोजी पोलीस पाटीलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते… या बैठकीमध्ये सेवानिवृत्त व उत्कृष्ट पेालीस पाटीलांचा आदर्श पोलीस पाटील म्हणून सत्कार करीत सन्मानित करण्यात आले… तसेच मयत पोलीस पाटीलांच्या कुटुंबाला खालापूर पोलीस ठाण्याने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला….
लोहोप गावचे मयत पोलीस पाटील कै.मोहन पाटील यांच्या कुटुंबियांना मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खालापूर विभाग, खालापुर तालुका पोलीस पाटील, खालापूर, रसायनी, खोपोली पोलीस ठाणेकडुन एकत्रिक 1,49,500 रूपयांची आर्थीक मदत विक्रम कदम, उपविभागीय पेालीस अधिकारी खालापूर यांचे हस्ते मयत पोलीस पाटील यांच्या पत्नी यांचेकडे देण्यात आली… त्याचप्रमाणे प्रदीर्घ सेवा देवुन निवृत्त झालेले उसरोली गावचे पोलीस पाटील श्री.खंडु पाटील, तोंडली पोलीस पाटील श्री.अनंत मलबारी, इसांबे पोलीस पाटील श्री.अनंत देवघरे, आसरोटी पोलीस पाटील श्री.हरिभाऊ म-या पाटील यांचा सत्कार उपस्थित पोलीस अधिका-यांकडुन करण्यात आला… तसेच जिल्हा बदली झालेले अंमलदार पो.शि.अभिमन्यू आहेरकर यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले… तसेच वर्षामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेले सावरोली गावचे पोलीस पाटील श्री.प्रमोद नारायण किळंजे यांना यावर्षीचा आदर्श पोलीस पाटील म्हणुन सत्कार करून गौरविण्यात आले.
त्यानंतर पोलीस पाटील यांनी त्यांचेमध्ये घडवुन आणलेला बदलाबाबत मनोगत व्यक्त केले व तदनंतर आणि मा. श्री विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर सदरवेळी मा.श्री.विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग, पोनि श्री.शितल राऊत, खोपोली पो.ठाणे, पोनि श्री.सचिन पवार, खालापूर पोलीस ठाणे, सपोनि श्री.प्रमोद जाधव, रसायनी पोलीस ठाणे व पोलीस पाटील हजर होते….