जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे:गट शिक्षण अधिकारी चोरमळे

0
57

चौक  शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या स्वभावात बदल करणे, भाव भावना यात संवेदनशीलता असणे आवश्यक असून लोक संग्रह करून अवगुण दूर सारून सामाजिक प्रतिमा निर्माण केल्यावर व्यक्तिमत्व विकास घडतो, असे प्रतिपादन गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमले यांनी केले…
खालापूर तालुक्यातील माजगाव केंद्रस्तरीय रायगड जिल्हा परिषद आयोजित क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा वडगाव शाळा येथे संपन्न झाल्या… त्याचा समारोप प्रसंगी ते बोलत होते…. स्पर्धेत वडगाव शाळेने एकूण आठ स्पर्धेतील सोळा पैकी नऊ प्रथम क्रमांकावर शिक्का मोर्तब केले….

या स्पर्धेत केंद्रातील एकूण नऊ शाळा व १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला… केंद्रातील सर्वात जास्त बक्षिसे जिंकणारी शाळा म्हणून वडगाव शाळेने बाजी मारत क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासात आपल्या यशाचा तुरा शिरपेचात खोचला आहे… या सर्व स्पर्धांसाठी संतोष बडे, दीपक अकोलकर, रेखा जाधव, विकास शेळके, एरवी राठोड यांनी  पंच म्हणून काम केले… उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य शिक्षण अधिकारी शेवाळे, केंद्रप्रमुख परदेशी, माजी उपसरपंच महादेव गडगे, करूणा ठोंबरे, अध्यक्ष SMC, राजश्री जांभुळकर, बिर्ला कार्बन चे CSR प्रमुख लक्ष्मण मोरे, वडगाव शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड व सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते… दुपार सत्रातील लगोरी या कार्यक्रमाचे उदघाटन माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांच्या हस्ते करण्यात आले… यावेळी विद्यार्थ्यांना माजी सरपंच ग्रुप, ग्रामपंचायत वडगावच्या गौरी महादेव गडगे यांच्यावतीने बक्षीस म्हणून चषक तर बिर्ला कंपनीकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले… या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मस्तान बोरगे यांनी केले तर सुभाष राठोड यांनी आभार व्यक्त केले… मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या कार्याचे कौतुक सर्वांनी केले…