खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
खोपीली नगरपरिषद हद्दीतील असणारे शेडवली -चिंचवळी,शास्त्रीनगर,काटरंग, वासरंग,डीपी रोड,खालची खोपोली परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळा सुरु होण्याआधी कोठ्यावधी रुपये खर्च करून अनेक भागात नगर परिषद प्रशासनाने नवीन डांबरी व सिमेंट काँक्रीटचे सुंदर रस्ते बनविण्यात आले होते.मात्र केबल लाईन,गँस लाईन,भुयारी गटारसाठी रस्ते खोदल्याने रस्त्यांची दूर अवस्था झाली आहे…या रस्त्यांवर प्रत्येक वर्दळीच्या ठिकाणी नगर परिषदेने प्लास्टिकचे नवीन तंत्रज्ञाने बनविलेले रेडिमेड तुकड्या तुकड्याचे रंगीत रस्त्यांवर गतिरोक लावण्यात आले आहेत. या आधी डांबरी रस्त्यावर डांबरचे गतिरोक बनविण्यात येत होते व ह्याच डांबरी रस्त्यांच्या कामातच डांबरचे गतिरोधक मोफत केले जात होते.मात्र आता नवीन तंत्रज्ञाने ( Technology)बनलेले लाखो रुपये किमतीचे प्लास्टिकचे गतिरोधक रस्त्यांवर खर्च करून लावले जात आहेत. मात्र तुकड्या तुकड्याचे गतिरोधक अवघे काही महिण्यातच अर्धे चंद्रावर तर अर्धे जमणीवर राहिले असल्याचे चित्र खोपोली शहरात रस्त्यांवर अनेक भागात पाहिल्यावर दिसून येत आहेत? रस्त्यांवर गतिरोधक निघून गेलेल्या ठिकाणी अर्धवट राहिलेल्या गतिरोधक मूळे दुचाकी,रिक्षा,कार,चालक गतिरोधक नसलेल्या ठिकाण्याहून सुसाट गाड्या पलवत असतात त्यामुळे दररोज अनेक छोटे मोठे अपघात होत असल्याचे नागरिकांन मधून बोलले जात आहे.तेसच हे गतिरोधक लोखंडी खिळे किंवा अँकर फासनर बोल्टवर लावले जातात .ह्या गतिरोधकाचे एक किंवा चार तुकडे निघाले की खिळे व बोल्ट रस्त्यावर निघून राहिल्याने गाड्यांचे टायर पंचर होतात. गाड्यांचे टायर पंचर होऊन बेचाऱ्या टायर पंचर दुकानदाराचा धंदा व्यवस्थित चालावा की मोठे भीषण अपघात होण्यासाठी? बांधकाम विभागाच्या अभियंतांना हे गतिरोधक निघाल्यावर हे बोल्ट खिल्ले तायरात घुसून टायर फुटणे अथवा पंचर होणे याचा अभ्यास नाही का? हे गतिरोधक किती दिवस किती महिने किती वर्ष टिकाव आहेत याचा टेस्ट रिपोर्ट यांनी पहिला आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे…
खोपोली शहरातील दरवर्षी खड्ड्यांच्या कामासाठी लाखो रुपये ओतल्यानंतरही नागरिकांची खड्ड्यांतून काही सुटका झालेली नाही.पावसाळा आला, की रस्त्यांवर खड्डे पडतात. इतरही वेळी ते असतात; परंतु पावसाळ्यात जास्त जाणवतात. रस्त्यांवर खड्डे का पडतात? रस्त्यांचे काम कशा पद्धतीने केले पाहिजे? खोदाईची कामे असली, तरी नंतर रस्ता नीट करण्यासाठी काय नियम आहेत, या आणि अशा प्रश्नांची ही उत्तरे बांधकाम विभागाचे अभियंता देण्याचा कष्ट का करीत नाहीत? पत्रकारांनी माहिती घेण्यासाठी खोपोली नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता अनिल वाणी यांना दूरध्वनी वरून संपर्क साधला असता सायबांनी पत्रकारांचा फोन उचलण्याचा कष्ट देखील केला नाहीं. या खोपोली शहरात कोणती मोठी दुर्घटना घडण्या आधी व कोणती अणि बाणी आल्यास या कामचुकार लोकसेवकांशी नागरिकांनी संपर्क साधण्याचा पर्येंत केला तर दुर्घटना घडल्यावर टीव्ही चायनल वर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे लोकसेवक येणार की मदतीसाठी ? ह्या लोकसेवकांना भेटण्यासाठी पत्रकारांनी ५ रुपयेचा स्टॅम्प टिकट लावून लेखी पत्र दिला असतांना पत्राचे लेखी उत्तर देखील देण्यात आला नाहीं. एकवेळ देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,राज्यपाल, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, सामान्य नागरिकांना व पत्रकारांना भेट देतात व समस्या जाणून घेतात मात्र खोपोली नगर परिषदेचे मुख्यअधिकारी यांच्या पेक्षा पदाने मोठे आहेत की काय? असे सवाल खोपोलीकरांमधून विचारला जात आहे…खोपोली नगर परिषद हद्दीत एका गावातील गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची लेखी तक्रार नागरिकांनी केले व अशा कामचुकार, आळशी, बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे आपले व खोपोली नगर परिषद प्रशासनाचे नाव खराब होत असते, तरी लवकरात लवकर आमच्या अर्जावर कारवाई करण्यात यावी व कारवाई काय करण्यात आली याची लेखी माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी असे अर्ज नमूद करून माहिती देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात आली होते…