पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांचे डांबरीकरण, गटारे अशी कामे पि.डि.पी आय एल या कंत्राटदाराला दिली आहेत… मात्र या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे आज एक शालेय विद्यार्थींनी डांबरामुळे भाजली असल्याची घटना नवीन पनवेल येथे घडली आहे… संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे… नवीन पनवेल येथे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असताना बॅरिगेट्स न लावल्याने डीएव्ही पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीच्या पायावर डांबर पडल्याने ती भाजली असल्याची घटना घडली आहे… पि.डि.आयपीएल या कंत्राटदारास पनवेल महानगरपालिकेच्या वतीने रस्ता डांबरीकरणाची व गटारांची कामे मोठ्या प्रमाणात दिली आहेत… शहरातील विविध भागात कामे सुरू असताना योग्य ती खबरदारी न घेता कंत्राटदार बेफिकीरपणे काम करत असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे… ज्या ज्या ठिकाणी गटारांची कामे चालू आहेत त्या त्या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात घडत असून, या कंत्राटदारामुळे अनेकांचे नुकसान होत असल्याचे बोलले जात असून महापालिकेने या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे…