पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पनवेल महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे…या राजवटीत मनपा प्रशासनाकडून लोकांवर अन्याय होण्याच्या घटना घडत आहेत… सर्व सामान्य माणूस,व्यापारी,व्यावसायिक,वाहनचालक ,रिक्षाचालक,शालेय विद्यार्थी,हमाल ,मजूर आदी त्रस्त आहेत… महापालिकेत कामासाठी गेलेल्या नागरिकाला अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळते… त्यामुळे मनपा अधीकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण कोणाचे ? असा सवाल होत आहे… अतिक्रमणाविरोधात पनवेल मनपा नोटीस न देता कारवाई करत आहे… त्यामुळे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक संतप्त आहेत… या गैरकारभाराची पनवेल मनपा आयुक्त चौकशी करतील का ? असा लोकांचा सवाल आहे… पनवेल मनपा आयुक्त हे लोकसेवक आहेत… त्यामुळे त्यांनी लोकांची सेवा करावी… अशी मागणी होत आहे… पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांची,गटारांची,डांबरीकारणांची कामे सुरु आहेत… या सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे कोणतेही उपाय नाहीत… परिणामी रस्त्याचे डांबरीकारण सुरु असताना dav पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी पायावर डांबर पडून भाजल्याची घटना नवीन पनवेल परिसरात घडली आहे… याप्रकरणी कारवाईची मागणी होत आहे…