खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तसेच जुन्या मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून पुन्हा एक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे…मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास टेम्पो क्रं. MH45.1920 या टेम्पोची पाठीमागून समोरील वाहनास जोरदार धडक बसल्याने अपघात झाला आहे…या अपघातात टेम्पो चालक सुरेश मोहिते वय वर्ष 31, रा. पंढरपूर टेम्पोची केबिन दबल्याने चालक टेम्पोच्या केबिनमध्ये अडकलेला होता…या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य आणि स्थानीक युवकांनी मदतकार्य करीत टेम्पो चालक सुरेश मोहिते याला केबिनमधून बाहेर काढला व पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्समधून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे पाठवण्यात आले…ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार झोप लागल्याने पुढील वाहनास पाठीमागून धडक दिली असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.