पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पनवेल-रोडपाली येथे भव्यदिव्य दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे …हा सोहळा शनिवार दि.१४ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होत आहे…यंदाचे उत्सवाचे हे रौप्य महोत्सव वर्ष आहे… त्यामुळे ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२४ पर्यंत सायंकाळी ५:३० ते ७:३० वाजता गुरुचरित्र पारायण होत आहे… १३ डिसेंबर रोजी दत्तयाग व त्यानंतर १४ डिसेंबर रोजी श्री. दत्त जयंती सोहळा संपन्न होत आहे…दत्तभक्त ठाकूर परिवाराचा हा धार्मिक सोहळा आहे… या उत्सवाची परंपरा स्वर्गीय ह.भ.प केसरीनाथ ठाकूर यांनी सुरु केली आहे… गेले काही वर्ष ही परंपरा त्यांचे दोन सुपुत्र प्रदीप केसरीनाथ ठाकूर व संदेश केसरीनाथ ठाकूर पार पाडत आहेत… दत्तगुरूंचे ठाकूर परिवाराला विशेष आशीर्वाद आहेत… त्यामुळे यंदा रौप्य महोत्सव वर्षी भव्यदिव्य सोहळा संपन्न होत आहे…यानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत… हे कार्यक्रम येणेप्रमाणे… शनिवार दि. १४/१२/२०२४ सकाळी ७ वा:-श्री दलांचे अभिषेक ,सकाळी १० वा:-श्री सत्यनारायणाची महापुजा,दुपारी ४ ते ६ वा:श्री दत्त जन्माचे किर्तन,युवाकिर्तनकार ह.भ.प. सुप्रियाताई भालेकर (बाजे-चेरिवत्ती),पखवाज साथ। रोशन महाराज भालेकर,गायन साथ ह.भ.प.बयन महाराज मढवी,ह.भ.प. पांडुरंग महाराज वाघ. ह.भ.प. बाळाराम महाराज शेळके,ह.भ.प. धाऊ महाराज पाटील. ह.भ.प. योगिता महाराज पाटील,सायं. ६ वा:तिर्थप्रसाद व महाप्रत्ताद,सायं. ७.३० वा.अभंगवाणी: श्री हनुमान प्रात्तादिक भजन मंडळ, वाजे ,गायक। हर्षाली जले, अंश पाटील, उदय भोईर,तबला – यश भोईर, मृदुंगसाध सार्थक पाटील ,हार्मोनियम – गजानन जळे तरी या उत्सव सोहळ्याचा परिसरातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन निमंत्रक प्रदीप केसरीनाथ ठाकूर व संदेश केसरीनाथ ठाकूर यांनी केले आहे…