खोपोली शिवसत्ता टाइम्स खलील सुर्वे
रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेचे तत्कालिन मुख्याधिकारी अनुप दुरे यांना नगरविकास विभागाकडून शासन आदेश क्र.एमसीओ-२०२३/प्र.क्र.३७४/नवि-१४ दि.१५.१२.२०२३ रोजी खोपोली नगरपरिषद मुख्याधिकारी या पदावरून सहायक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका या पदावर पदस्थापना करण्यात आली होती… परंतु अनुप दूरे यांनी प्राधिकाऱ्यास कोणतीही पूर्व सूचना न देता व पूर्व परवानगी न घेता ते सदर पदावर रूजु झाले नाहीत… तसेच सदर कारणासाठी त्यांना शासन पत्र क्र.एमसीओ-२०२३/प्र.क्र.३६२/नवि-१४ दि.१९.०९.२०२४ रोजी कारणे दाखवा याबाबत नोटीस देखील बजाविण्यात आली होती… त्यानंतरही ते सदर पदावर रूजु झाले नाहीत… ही बाब गंभीर असून त्यांनी शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ३ चा भंग केला आहे… तसेच अनुप दुरे यांना मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात आले… सदर बाब त्यांना माहित असून देखील त्यांनी खोपोली नगरपरिषदेच्या वाहन चालकावर दबाव टाकून शासकीय वाहन घेऊन ते दि.१८.१२.२०२३ रोजी मुंबई येथे गेले होते… यावरून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर निलंबन करण्याचे आदेश दिले असल्याची नोटीस बजावली आहे…