बिबटयाच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार…सुभाष शिर्के यांच्या गोठ्यातील वासरू…

0
40

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

दासगाव बामणे कोंड येथील गुरांच्या गोठ्यात रात्री तीन वाजता बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे…त्यामध्ये गाईचे वासरूवर बिबट्याने हल्ला केला आहे…त्याचवेळी बिबट्याने गाईच्या वासराला जागीच ठार केले…बामणे कोंड येथिल रहिवासी सुभाष शिर्के यांच्या गोठ्यामध्ये दहा गाई व गाईंचे वासरे आहेत…काल सकाळी 3 वाजण्याच्या सुमरास बिबट्याने गोठ्यात जाऊन वासरावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आणि ते वासरू जाग्यावर मृत्यू पावले… वासराच्या गळ्यावर बिबट्याने पंजाचे निशाणे केलेले दिसत आहेत… दासगावमधील वेगवेगळ्या वाडी वस्तीत बिबट्याचा संचार वाढला आहे…काही दिवसांपूर्वी दासगाव येथे जाधव वाडी येथील चंद्रकांत लुटे यांच्या कुत्र्याला बिबट्याने जखमी केले होते…त्याचबरोबर मंगेश कामतेकर यांच्या दोन बकऱ्या देखील बिबट्याने ठार मारल्या होत्या…अशा दररोज काही ना काही घटना घडत आहेत…शेळी पालन व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे…याकडे वनविभागाने तात्काळ लक्ष दयावे अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत…