पेठगाव येथे भव्यदिव्य दत्तजयंती सोहळा आणि धार्मिक कार्यक्रम… जयेंद्र शेळके,रवींद्र शेळके यांचे शानदार आयोजन

0
87

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

          शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी ‘श्री दत्त जयंती उत्सव’ पेठगाव सेक्टर-३३ खारघर नवी मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे… तरी या धार्मिक  कार्यक्रमाला सर्व संत मंडळी, अबाल वृध्द व बंधु भगिनी यांनी उपस्थित राहुन धार्मिक सोहळा साजरा करावा असे आवाहन जयेंद्र शेळके,रवींद्र शेळके यांनी केले आहे…

             या सोहळ्यातील कार्यक्रम येणेप्रमाणे सकाळी ५ ते ६ वा. : काकड आरती, सकाळी ८ ते ९ वा. : अभिषेक व श्रींचे पुजन, सकाळी १० ते ११ वा.: श्री. दत्त प्रासादिक भजन मंडळ, पेठगाव, बुवा – शांताराम पाटील, नरेश शेळके, कु. अविष्कार पाटील, संस्कार शेळके, एकता भाग्यवंत, उर्जिता पाटील, मृदुंगमणी – एकनाथ भाग्यवंत, रणजीत पाटील, महेंद्र शेळके, सकाळी १० ते १२ वा.: श्री गणेश्वर प्रासादिक भजन मंडळ, धानसर बुवा – मोतीराम कडु, मृदुंगमणी – मिलींद कडु, दुपारी १२ ते १ वा.: श्री कृपा प्रासादिक भजन मंडळ, पेठगाव- गायिका – सौ. मिलन शेळके, कु. एकता भाग्यवंत, मृदुंगमणी – श्री. महेंद्र शेळके,दुपारी १ ते २ वा.: जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, मुर्वी… बुवा – अशोक बुवा पाटील, मुटुंगमणी – मनिष पाटील, चंद्रकांत नावडेकर, दुपारी २ ते ३ वा.: जय हनुमान महिला हरिपाठ मंडळ, मुर्बी, दुपारी ३ ते ४ वा.: लक्ष्मी नारायण प्रासादिक भजन मंडळ, पेठाळी… बुवा – मधुकर केणी, मृदंगमणी – कुमार केणी, दुपारी ३ ते ४ वा.: श्री लक्ष्मी नारायण हरिपाठ मंडळ, पेठाळी… सायं. ४ ते ६ वा. दत्त जन्म कीर्तन, कीर्तनकार : रायगड भूषण ह.भ.प. द्वारकानाथ महाराज देशमुख – कर्जत, मृदुंगसाथ : श्री. एकनाथ भाग्यवंत, श्री. रणजीत पाटील, विणेकरी : ह.भ.प. बळीराम चंदर जोशी चोपदार: ह.भ.प. सुरेश ठाकुर (मुर्वी), सायंकाळी ७ ते ८ वा.: गावदेवी प्रासादिक भजन मंडळ, पेठगाव,बुवा – वसंत बुवा जोशी, जितेंद्र बुवा जोशी, मृदूंगमणी – जय पाटील, किरवली, चालक : हनुमान वारकर. ,सायंकाळी ७ नंतर : महाप्रसाद, रात्री. ९ वाजता : पालखी मिरवणुक निघणार आहे…

         या धार्मिक कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक जयेंद्र बबन शेळके (माजी सदस्य ग्रामपंचायत ओवे ) संपर्क:- (८६५५५७५०००), श्री. रविंद्र बबन शेळके (श्री त्रिमूर्ती एंटरप्राइजेस) संपर्क – (८०८२२२९९९१) व श्री. जगदीश बबन शेळके (संपर्क) – ७०३९३८३२२३ हे आहेत… सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री त्रिमुर्ती मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ, पेठगाव यांच्याकडे आहे…कार्यक्रम स्थळ मु. पेठगाव, सेक्टर ३३, पेठपाडा मेट्रोस्टेशन, खारघर, ता. पनवेल, नवी मुंबई असे आहे… तरी या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयेंद्र शेळके,रवींद्र शेळके,जगदीश शेळके यांनी केले आहे…