गोरेगाव शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
गोरेगांव ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ६ गुंठे जागेत अनाधिकृत बांधकाम झाले असल्याची पूर्णपणे खात्री झाल्यावर पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांवकडे सतत पत्र व्यवहार करून देखील सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर २६ जानेवारी २०२४ रोजी होत असल्याने बेमुद्दत उपोषणाचा पावित्रा घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत जागेची मोजणी करण्यात आली व सदर अनाधिकृत बांधकाम झालेली जमीन ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे असल्याचे निष्पण झाले..
प्रसाद गोरेगांवकर यांनी शासनाची जमीन वाचवण्यासाठी केलेल्या उपोषणाचे जनतेकडून कौतुक देखील करण्यात आले होते…व तेज मराठी न्यूज मार्फत उपोषणाची बातमी प्रसारित देखील करण्यात आली होती , मात्र २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रसाद गोरेगांवकर यांच्या उपोषणाला एक वर्ष पूर्ण होईल तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत अनाधिकृत बांधकाम हटवण्यासाठी कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही ना शासनाची जमीन वाचवण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारणारे पत्रकार प्रसाद गोरेगांवकर हे देखील गेल्या वर्ष भरापासून निद्रावस्थेत आहेत. त्यांनी उपोषण करुन दिखावा केला होता? की सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांव व पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांच्या संगमताने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जमिनीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे…? सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांव स्वतःची म्हणजेच शासनाची जमीन ताब्यात घेण्यासाठी जाणून बुजून का दुर्लक्ष करत आहे? पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांचा शासनाची जमीन वाचवण्यासाठी केलेला उपोषण खरोखरच न्याय हक्का साठी केलेला कि फक्त एक दिखावा होता? सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांव व पत्रकार प्रसाद गोरेगांवकर का निद्रावस्थेत आहेत? असे अनेक प्रश्न गोरेगांव व आजुबाजुच्या नागरीकांकडून दबक्या आवाजात विचारले जात आहेत.