नवी मुंबईकरांसाठी ऐतिहासिक क्षण…नवी मुंबई विमानतळावर व्यावसायिक विमान लँडिंग…

0
45

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडींग झालं. विमानाच्या लँडींगवेळी, अग्निशमन दलाकडून पहिल्या विमानाला वॉटर सलामीही देण्यात आली. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेलं हे विमानतळ पुढील वर्षी म्हणजेच मार्च 2025 रोजी पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. विमानतळाला दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून लवकरच केंद्र सरकारकडूनही त्यास मान्यता मिळणार आहे. नवी मुंबई विमानतळावर आज 29 डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो A-320 चं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. महिनाभरापूर्वी वायुदलाच्या सी 295 आणि सुखोई 30 ही विमान धावपट्टीवर उतरवण्यात आली होती. या विमानांचे लँडींग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे.हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवीन मुंबई विमानतळ देशातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ आहे. जवळपास 5,945 एकर जागेवर मुंबईपासून 40 किमी अंतरावर पनवेलजवळ हे विमानतळ उभारण्यात आलं आहे.