अलिबागमध्ये किहीम बीच फेस्टिव्हलची धूम…किहीम बीच फेस्टीव्हलमधून कोकण संस्कृतीला चालना…

0
164

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

कोकणात अनेक फेस्टीव्हल भरवले जातात…या फेस्टीव्हलमधून कोकणची संस्कृती उलगडली जाते.अलिबागमध्ये सध्या अनेक समुद्र किनाऱ्यावर फेस्टिव्हलची सुरू असलेली धूम पहायला मिळते.या फेस्टीव्हलमध्ये अलिबागसह कोकणातील इतर सांस्कृतिक आणि लोककलेच मनोरंजन होताना पहायला मिळते. सध्या सुरू असलेल्या किहीम बीच फेस्टीव्हलला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे…अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुध्दा या फेस्टिव्हलचा आनंद लुटला. पर्यटनाला चालना देण्यासाठी असे फेस्टिव्हल भरवले जात असून यामधून स्थानिकांना आपल्या कोकण खाद्य संस्कृतीचा देखील उलगडा करण्यास संधी मिळते…