सुरक्षा सप्ताहानिमित्त उरणमध्ये मोटर सायकल हेल्मेट रॅली…वाहनचालकांमध्ये जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन…

0
49

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील) :-

सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक परिवहन अधिकारी जनार्दन घाडगे यांच्या सूचनेनुसार व साहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी निकोलस पांडे, हेल्मेट गुडघरणा करताना प्रचंड वाहनचालकांची गर्दी होती… दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ वाजता उरण येथील नागरिक व वाहन मालकांमध्ये जन जागृती घडवून आणण्यासाठी ओएनजीसी हॉस्पिटल ते उरण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोटर सायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली… या रॅलीमध्ये वाहन चालकांनी वाहने चालविताना हेल्मेट वापरणे याचे महत्त्व व वाहतूक नियमांचे पालन याची माहिती देण्यात आली…
रॅलीत सहभागी अधिकारी व प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक प्रवाश्यांनी प्रचंड गर्दी केली… या रॅलीत सुमारे ६० ते ७५ महिला व पुरुष मोटर सायकल व मोटर वाहनांसोबत वाहनांनी सहभाग घेतला होता… सदर प्रसंगी मोटारसायकल वाहन निरीक्षक दिपक भोईर राकेश रावते सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भाऊसाहेब कदम तसेच राघोबा देव मोटार ट्रेनिंग रकुलचे मालक तेजस पाटील तसेच इतर ट्रेनिंग रकुलचे जितेंद्र प्रधान, गणेश भोईर, बळीराम ठाकूर उपस्थित होते…