तहसीलदार व तलाठी यांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न…पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू माफियांची गुंडगिरी…

0
46

सिंधुदुर्ग शिवसत्ता टाइम्स  (देवेंद्र मोरे) :-   

सिंधुदुर्ग येथील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू माफियांची गुंडगिरी येथील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या डंपरवर कारवाई करायला गेलेले नायब तहसीलदार प्रतिक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डंपर चालकाविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे… कुडाळ तहसीलदार वुरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखालील पथक अवैध वाळू वाहतूक वरील कारवाईसाठी नियुक्त करण्यात आले आहे… वालावल मंडल अधिकारी घाटकर नगरचे निलेश गौतम कांबळे, माणकादेवीचे स्नेहल जयवंत सागरे, सोनवणेतर्फे कळसुलेचे शिवदास राठोड, पणदूरचे रणजित कदम, शिवापूरचे सूरज भांदिगरे या सर्व कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे…
दरम्यान अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता कंबर कसली आहे…  यासाठी नेमलेले अधिकाऱ्यांचे पथक सर्वत्र फिरत असताना शुक्रवारी दि.१७ जानेवारी  रोजी रात्री ११.०० वाजता या पथकाला पिंगुळी गुढीपूर येथील शिक्षक कॉलनीजवळ डंपर लागल्याचे आढळून आले… या ठिकाणी चार डंपर होते… या डंपर्सची तपासणी केली असता त्यांमध्ये अनधिकृत अवैध वाळू भरल्याचे दिसून आले… हे डंपर कोणाचे आहेत, त्यांचे चालक कोण आहेत, याची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी वाट पाहिली परंतु उशीरापर्यंत कोणीच आले नाही… त्यानंतर रात्री १.०० वाजता डंपर क्रमांक MH07X0267 चार चालक तेथे उपस्थित झाला… त्याने आपले नांव मिलिंद नाईक असे सांगितले… त्याठिकाणी पंचांची यादी केल्यानंतर हा डंपर कुडाळ तहसील कार्यालयात तलाठी निलेश कांबळे यांच्यासह पाठवून देण्यात आला… उर्वरित तीन डंपरच्या चालकांची वाट पाहिल्यानंतर पथकातील काही कर्मचारी वस्तीसाठी गेले… त्यानंतर पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणचे डंपर सुरू झाल्याचे आवाज ऐकल्यावर लगेच नायब तहसीलदार प्रतीकस आढाव हे पाहण्यासाठी गेले असता, डंपर क्र. (MH06AQ7097) च्या चालकाला आवाज देवून थांबविण्यासाठी सांगितले मात्र त्यांनी काही न ऐकता डंपर सरळ अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला… तेव्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव प्रसंगावधान राखून झपकन बाजूला गेल्यामुळे वाचले… हा डंपर वेगाने निघून गेला… नायब तहसीलदार आढाव यांनी या डंपरचा केलेला निष्फळ ठरल्याने नायब तहसीलदार पुन्हा पिंगुळी येथे परतले…
तर पकडलेल्या डंपर पैकी MH06C6631 क्र.च्या डंपर चालकाने तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून दुसऱ्या बाजूस उडी घेतल्याने बचावले… याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात दोन्ही डंपर चालकांविरोधात नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी गुन्हा नोंदवला आहे…याप्रकरणातील इतर दोन डंपर पोलीसांनी कुडाळ तहसील कार्यालयात आणून ठेवले आहेत… पुढील तपास कुडाळ पोलीस कसून करत आहेत…