थळ अलिबाग संघ डिके चषक 2025 चा अंतिम विजेता तर कालेश्री पेण संघ उपविजेता… 

0
50

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी) :-

पेण येथील समाजसेवक दत्ता कांबळे यांनी नगरपालिकेच्या भव्य मैदानावर टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते… यावेळी झालेल्या चुरशीच्या सामन्यात माऊ 11 एकविरा थळ अलिबाग संघ अंतिम विजेता ठरला… तर श्री राम भक्त कालेश्री पेण संघ उपविजेता ठरला… पेण तालुक्यामध्ये भव्यदिव्य नियोजनासह 1 लाख रुपये पारितोषिक असलेल्या टेनिस क्रिकेट सामन्यांचे वक्रतुंड मित्र मंडळाकडून आयोजन करण्यात आले होते… सामन्यांतील मालिकावीर कालेश्री संघाच्या प्रतीक ठाकूर याला होंडा कंपनीची मोटारसायकल बक्षीस देण्यात आली… सदर डिके चषकाला आजी माजी खासदार आमदारांसह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली…
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर झालेल्या या क्रिकेट सामन्यांत मुंबई, पनवेल, नवी मुंबई, भिवंडी, ठाणे, पेण, अलिबाग, उरण, महाड, रोहा, खोपोली, कर्जत आदी शहरांतील 32 संघांनी सहभाग घेतला होता… यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतींमध्ये अलिबागचा माऊ 11 एकविरा थळ संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला… त्यांस 1 लाख रुपये रोख रक्कम व भव्य ट्रॉफी देण्यात आली… तर पेण तालुक्यातील श्री राम भक्त कालेश्री संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला, त्यांस 50 हजार रुपये रोख व भव्य ट्रॉफी देण्यात आली… तृतीय क्रमांक आराध्य 11 जिते-पेण संघास 25 हजार रोख व ट्रॉफी व चतुर्थ क्रमांक गावदेवी सोनखार संघास 25 हजार व ट्रॉफी देण्यात आली… सदर सामन्यांचा मालिकावीर कालेश्री संघाचा प्रतीक ठाकूर याला होंडा कंपनीची मोटारसायकल बक्षीस देऊन गौरविण्यात आले… तर यावेळी पेण पत्रकार, पेण पोलिस, महावितरण आणि वक्रतुंड मंडळ पेणमध्ये मैत्रीपूर्ण लढत खेळविण्यात आली… यामध्ये पेण पोलीस विजेते ठरले…
सदर सामन्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, भाजप आमदार विक्रांत पाटील, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रुपेश म्हात्रे, पनवेलचे उद्योजक जे.एम.म्हात्रे, भाजप युवा नेते यश प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, वक्रतुंड मंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे, माजी जि.प.उपाध्यक्ष आस्वाद पाटील, पनवेल महानगरपालिका उपाध्यक्ष प्रितम म्हात्रे, जि.प.सदस्य डी.बी.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, तहसीलदार तानाजी शेजाळ, साधना कांबळे,  उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पुणे उद्योजक संतोष धनकवडे, जेष्ठ समाजसेवक अण्णा कडू, शेखर गायकवाड, माजी नगरसेवक निवृत्ती पाटील, माजी शहरप्रमुख प्रदीप वर्तक, तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेळदार, मंगेश दळवी, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, विजय मोकल, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष झेन नाईक, मनसेचे रुपेश पाटील, नरेंद्र ठाकूर, तरणखोप सरपंच दिनेश पाटील, राजू पाटील, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते…
सदर सामने पार पाडण्यासाठी डिके चषक वक्रतुंड मित्र मंडळाचे मंगेश पाटील, प्रवीण पाटील, राजू कांबळे, राज कडू, स्वप्नील पाटील, लल्ला वास्कर, विनायक पाटील, ओमकार डाकी, शुभम पाटील, रोहन पाटील, सूरज म्हात्रे, सचिन म्हात्रे, गजानन पाटील, संदेश पाटील, समीर म्हात्रे, रोहित पाटील, जयेश पाटील व इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली… सदर क्रिकेट सामन्यांत पंच म्हणून संतोष चौधरी, प्रवीण आंद्रे यांनी काम पाहिले तर समालोचन रोशन पाटील, परमेश पाटील, रुपेश ठाकूर आदींनी केले…