रस्त्यांवर खड्डे आहेत की मृत्यूचे सापळे?… चेंढरे बासपास येथील रस्ता कित्येक दिवस नादुरुस्त…

0
39

अलिबाग  शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारावर अरुंद नादुरुस्त रस्त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे…चेंढरे बायपास येथील अलिबागकडे येणाऱ्या रस्त्याचा सुरुवातीचा नादुरुस्त भाग व रस्त्यामध्ये असलेले लोखंडी दुभाजक यामुळे गर्दीच्या वेळी मोठी वाहने विरुद्ध दिशेला जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे…चेंढरे बासपास येथे गेली कित्येक दिवस नादुरुस्त रस्ता आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असून, यामुळे अनेकांचे अपघात झाले आहेत. रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता आता बांधकाम विभागाने या नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती करणे अवश्यक आहे…