तिसऱ्या लुप-लाईनच्या कामासाठी कोंकण रेल्वेचा उद्या ब्लॉक… दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम…

0
43

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :- 
दि. २४ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी कोंकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकावर तिसऱ्या पॅसेंजर रूप लाईनच्या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकचे रेल्वे सेवांवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत.दि. २४ जानेवारी २०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र.‌ ५०१०४ रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ही गाडी रत्नागिरी स्थानकावरून पुनर्नियोजित वेळेनुसार ०१.२५ तास उशिराने म्हणजे  सकाळी ७.०० वाजता रत्नागिरीहून निघणार आहे.दि. २४ जानेवारी २०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. १२२०२ कोचुवेली-लोकमान्य टिळक टर्मिनस  ही गाडी रत्नागिरी-चिपळूण विभागादरम्यान मर्यादित वेगाने म्हणजेच उशिराने चालविण्यातयेणार आहे.