बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना… जन्मदात्या पित्याकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार…

0
106

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडली आहे. पित्यानेच स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीवर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे… याबाबत सविस्तर वृत्त असे की,पित्यानेच स्वतःच्या मुलीवर 2017 पासून स्वतःची मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. वारंवार होत असलेले लैंगिक अत्याचार सहन न झाल्यामुळे पीडित मुलीने अखेर पोलीस ठाणे गाठलं. आणि स्वतःच्या बापा विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बापाने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. महाड एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीच्या बापाला अटक केली असून त्याच्या विरोधात पोकसो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.