मुंबईतील राणीच्या बागेत नवनव्या सापांच्या प्रजाती… जुन्या सर्पालयाच्या जागी उभारणार नवीन सर्पालय…

0
39

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी-संघ्रहालय (राणीबाग) येथे आता नवनवीन प्रजातींच्या सर्पांचे दर्शन होणार आहे. लवकरच येथे नवीन सर्पालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे.दरम्यान, येत्या काही महिन्यात सर्पालयाच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे.प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सर्पालयाबाबत प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी सादर केला होता त्या प्रस्तावास मागील महिन्यात मंजुरी मिळालेली आहे.यानुसार काही दिवसांत सर्पालयासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. आलेल्या निविदांची छाननी करून सर्पालयाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात येणार असून २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती सर्पालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान, जुने सर्पालय तोडून त्याजागी १६८०० चौरस फूट जागेत नव्याने एक अत्याधुनिक सर्पालव बांधण्यात येणार आहे.त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना विविध प्रजातींचे सर्प पहायला मिळणार आहेत. सध्या प्राणीसंग्रहालयात पेंग्विन, वाघ आणि देशी हत्ती इत्यादी प्राणी आहेत.