मुंबई लोकल लाईनवर ३ दिवसांचा मेगा ब्लॉक…लोकलच्या तब्बल २७७ फेऱ्या होणार रद्द…

0
45

मुंबई शिवसत्ता टाइम्स ( देवेंद्र मोरे ) :-

मुंबईच्या लाईफ लाईनला तिनं दिवसांचा सलग ब्रेक लागणार आहे.येत्या २४, २५ आणि २६ जानेवारी रोजी पश्चिम रेल्वेवर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे असे ताजे वृत्त आहे.त्यामुळे तब्बल २८८ गाड्या रद्द करण्यात आल्या असून गाड्यांचे वेळापत्रक देखील ढासळणार आहे.माहिम ते वांद्रे दरम्यान पुलाच्या पुनर्बाधणी करीता शुक्रवार ते रविवार असा हा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येईल असे प. रेल्वे प्रशासनाने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
यामुळे प.रेल्वेच्या प्रवाशांना मात्र मेगा हाल‌ सोसावे लागणार आहेत.शुक्रवारी रात्री पासून ते रविवारी सकाळी पर्यंत सलग मेगा ब्लॉकचा फटका मेल व एक्स्प्रेस गाड्यांनाही बसणार आहे त्यामुळे त्यांच्या वेळाही बदल करण्यात आले आहेत असे प. रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.पहिला ब्लॉक शुक्रवारी रात्री घेण्यात येणार असल्याने शेवटची चर्चगेट-विरार लोकल रात्री ११.५८ ला सुटेल. दरम्यान रात्री ११.०० वाजल्यापासून चर्चगेट वरून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल्स मुंबई सेंट्रल आणि सांताक्रुझ दरम्यान जलद लाईनवरून वाहतूक करतील.महालक्ष्मी, लोअर परळ, एल्फिन्स्टन रोड, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड येथे कोणत्याही गाड्या थांबणार नाहीत.शनिवारी विरारहून सकाळी पहिली विरार-चर्चगेट गाडी स. ५.४७ ला सुटेल.शनिवारी चर्चगेट वरून पहिली फास्ट लोकल स. ६.१४ ला सुटेल तर स्लो लोकल स. ८.३० ला सुटेल.शनिवारी रात्री घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे चर्चगेट ते दादर दरम्यान जलद लोकल धावतील.
शनिवारी स. विरार, नालासोपारा, वसई रोड, भायंदर, बोरीवली धिम्या व जलद लोकल अंधेरी पर्यंत धावतील.तर शेवटची विरार-चर्चगेट लोकल रात्री १०.०८ ला सुटेल.शेवटची चर्चगेट -बोरीवली रात्री १०.३३ ला सुटेल.रविवारी सकाळी पहिली चर्चगेट -विरार जलद लोकल ८.३५ ला सुटेल.तर विरार -चर्चगेट पहिली लोकल स. ७.३८ ला सुटेल…