अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग जिल्हा रूग्णालयासमोरील गेले चार महिने अनधिकृतपणे उभी केलेली अवाढव्य लोखंडी धोकादायक होर्डींग अखेर अलिबाग नगरपरिषदेने हटविली आहे… अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडील जनहित याचिका क्रमांक 155/2011 दिनांक 19/12/2024 अन्वये सार्वजनिक रस्ते पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डिंग बॅनर पोस्टर विशेष मोहीम घेऊन हटविण्याचे आदेश असल्याचे लेखी निवेदन अलिबाग नगरपरिशदेचे मुख्याधिकारी व संबधीत अधिकारी यांना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे… अलिबाग जिल्हा रूग्णालयासमोरील गेले चार महिने अनधिकृतपणे उभी केलेली अवाढव्य लोखंडी धोकादायक अनधिकृत होर्डींग काढून टाकण्याबाबत अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबधीत अधिकारी यांना वारंवार दुरध्वनी करूनही हे धोकादायक लोखंडी होर्डिंग हटविले जात नसल्याची बाब उघड झाली होती… मुंबई उच्च न्यायालयाकडील जनहित याचिका क्रमांक 155/2011 दिनांक 19/12/2024 अन्वये सार्वजनिक रस्ते पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डिंग बॅनर पोस्टर विशेष मोहीम घेऊन हटविण्याचे आदेशित केले होते…