महाडमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ…डान्स क्लास शिकायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार… 

0
103

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने ) :-

महाड तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. एकीकडे महाराष्ट्र राज्य सरकार महिलांना प्रथम प्राधान्य मिळावं याकरिता मुलींसाठी उच्च शिक्षण व विविध योजना राज्यामध्ये राबवत आहेत. मात्र अजूनही राज्यामध्ये पीडित अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. नुकतीच महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमधील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महाड शहरातील एका अल्पवयीन मुली सोबत अश्लील कृत्य झाल्याची घटना  घडली आहे. अल्पवयीन पीडित मुलगी ही डान्स क्लास शिकण्यासाठी महाड येथे एका दांपत्याकडे जात होती.यामध्ये आरोपी दोघेही नात्याने पती-पत्नी असून पतीने पत्नीस बाहेर जा असे सांगून आरोपी पतीने अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात करून तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या संपूर्ण प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात दोघांनी विरोधात पॉक्सॉ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा पती-पत्नी आरोपींना अटक केली आहे. महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत…