चिपळूणकरांसाठी मोठी खुशखबर… लवकरच आठ डब्यांची पनवेल-चिपळूण DMU लोकल धावणार…

0
49

चिपळूण शिवसत्ता टाइम्स ( देवेंद्र मोरे) :-

चिपळूण कोंकणातील मध्यवर्ती सर्वाधिक गजबजलेले आणि गर्दीचे रेल्वे स्टेशन आता पनवेल ते चिपळूण अशी ८ डब्ब्यांची DMU (डिझेल मल्टीपल युनीट) लोकल येत्या एप्रिलपासून धावणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे…
यामुळे आता दररोज मुंबई अप-डाऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच अचानक प्रवास करणारे अनेक प्रवाशी असतात त्यांना या सेवेने मोठाच दिलासा मिळणार आहे…