शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकदिवसीय योगशिबिर संपन्न!….

0
48
मुंबई शिवसत्ता टाइम्स (पूनम पाटगावे):- 

शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी, महाराष्ट्र योगशिक्षक संघचे संस्थापक अध्यक्ष डॉ मनोज निलपवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्यातर्फे रायगड-कडाव येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता एक दिवसीय योगशिबिर घेण्यात आले. या योगशिबिरात दीडशेहुन अधिक विद्यार्थी व शाळेतील सर्व स्टाफ उपस्थित होते. या प्रसंगी कडाव येथील शिक्षणाधिकारी संतोष नवनाथ दौंड , केंद्र प्रमुख अरुण पार्टे,  शाळेतील मुख्याध्यापिका जयश्री अहिरे,  मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल असे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्याच्या या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला,  तसेच शिबिराच्या शेवटी सदस्य सचिन येवले यांनी घेतलेल्या हास्ययोग मध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोषात आनंद साजरा केला. या सर्व नियोजनात मुंबई जिल्ह्याचे महासचिव  कृष्णकुमार शिंदे, कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, सचिव अमित चिबडे, सुषमा माने, उपाध्यक्षा साक्षी कलगुटकर, सोशल मीडिया प्रभारी प्रशांत मकेसर, महिला प्रकोष्ट प्रभारी डॉ. पौर्णिमा काळे,  सदस्य सचिन येवले यांच्या सर्वांच्या मेहनतीने व उपस्थित विद्यार्थ्यांमुळे हे उपक्रम यशस्वी झाल्यामुळे मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.