पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदीप मोकल):-
पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या पुढाकाराने वडखळ शहरात सात कलमी योजनेअंतर्गत एकूण 75 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लोकसहभागातून बसविण्यात आले आहेत… या उपक्रमात स्थानिक कंपन्या, ग्रामपंचायत, पेट्रोल पंप, बँका, तसेच व्यापाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे… यामध्ये जे.एस. डब्लु .कंपनी: 15 कॅमेरे, जॉन्सन कंपनी: 4 कॅमेरे, ग्रामपंचायत वडखळ: 26 कॅमेरे, पेट्रोल पंप: 11 कॅमेरे, बँका, मोबाईल शॉप, ज्वेलर्स 24 कॅमेरे वडखळ हे मुंबई – गोवा महामार्गावरी महत्वाचे ठिकाण आसुन या परीसरात औद्योगिकरण झपाट्याने वाढत असून, देशाच्या कानाकोप-यातून या ठिकाणी नागरिक येत असतात… नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वडखळ शहरातील प्रमुख ठिकाणी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे लावण्यात आले आहेत, ज्यात वडखळ नाका, मुख्य बाजारपेठ, मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे ब्रिज, धरमतर चेक पोस्ट आणि अलिबाग रोड यांचा समावेश आहे… या प्रणालीचा एक याचा बॅकअप असल्याने शहरातील येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर बारकाईने नजर ठेवणे शक्य झाले आहे…
या सीसीटीव्ही प्रणालीमुळे चार अपघातांचे उघडकीस न आलेले गुन्हे सी.सी. टी.व्ही.च्या च्या मदतीने उघडकीस आले…. मुलींची छेडछाड, बँक परिसरातील चोरी, बॅग लिफ्टिंग, चैन स्नॅचिंग, वादावादी आणि मारामारी यांसारखे गुन्हे कमी झाले आहेत…. सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांमुळे वडखळमधील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, व पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे… या उपक्रमाबाबत सर्व स्तरांवरून समाधान व कौतुक व्यक्त केले जात आहे….
पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनानुसार सात कलमी योजनेअंतर्गत वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील वडखळ शहरात एकूण 75 CCTV कॅमेरे लोक सहभागातून लावण्यात आले असल्याचे वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले… वडखळ पोलीस ठाण्याच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या उपक्रमाने जागरूकता वाढवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे….