रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तळेगाव जवळील गोदरेज सिटीमध्ये जवळपास पंधरा हजार रुपये किमतीचे अल्युमिनियम प्लेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवार दि.२२ रोजी उघडकीस आल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि.२१ जानेवारी रोजी रात्री ८ ते २२ जानेवारी रोजी सकाळी९ च्या दरम्यान तळेगाव गावच्या हद्दीत असलेल्या गोदरेज सिटी फेज मध्ये कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी कंपनीचा पत्र उचकटून आत प्रवेश करत स्कायलाईन कंट्रक्शनच्या कामासाठी ठेवलेले अंदाजे १५ हजार रुपये किमतीच्या अल्युमिनियम प्लेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने याबाबतची फिर्याद विजय प्रताप भोसले यांनी रसायनी पोलीस ठाण्यात दिली असून, रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध बी.एन. एस.कलम३०५,३३१(३),३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे… याबाबत अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चौरे हे करीत आहेत…